हॉंगकॉंगमध्ये सापडला बॉम्ब

भाषा

शुक्रवार, 8 ऑगस्ट 2008 (23:00 IST)
ऑलिंपिक तयारीसाठी चीन नववधू प्रमाणे सजले असताना आणि चीनमधील सुरक्षा व्यवस्था कडेकोट केली असतानाही हॉंगकॉंगमध्ये भुमिगत रेल्वे स्थानकावर एक बॉम्ब आल्याने खळबळ उडाली आहे. चीन सरकारने यानंतर देशातील सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑलिंपिक उद्घाटन सोहळ्यापूर्वी काही तास आधी या बॉम्बचा शोध लागल्याने पोलिसांनी या रेल्वे स्थानकावर धाव घेत हा बॉम्ब निकामी केला. याविषयी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. ऑलिंपिकच्या विविध स्पर्धा हॉंगकॉंगमध्ये होणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा