ऑलिंपिकच्या निमित्ताने चीनने संस्कृती, जीवन व क्रीडा जगताचे दरवाजे खुले केले आहेत. चोविसाव्या ऑलिंपिकचा येथे रंभारंग सोहळ्याने शुभारंभ झाला. भव्य सोहळ्यात सुमारे पंधरा हजार कलाकारांनी कौशल्य दाखवून प्रेक्षक व पाहुण्यांना आश्चर्यचकित केले.
सतरा दिवस चालणाऱ्या या क्रीडा सोहळ्यात 205 देशातील खेळाडू सन्मान व पदकांसाठी कौशल्य पणास लावतील. तीनशे दोन पदकांसाठी श्रेष्ठ खेळाडूंमध्ये स्पर्धा रंभणार आहे.
षपन्न सदस्यीय भारतीय खेळाडूंच्या पथकाचे नेतृत्व ऑलिंपिक पदक विजेत्या राजवर्धन राठोड याने केले. सोहळ्यास कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी सहकुटुंब उपस्थित आहेत.