माझ्या यशाने क्रीडाक्षेत्राचा चेहरा बदलेल-बिंद्रा

वार्ता

सोमवार, 11 ऑगस्ट 2008 (15:59 IST)
आपल्या या यशाने देशातील क्रीडाक्षेत्राचा चेहरामोहरा बदलेल, अशी आशा ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने व्यक्त केली आहे.

सुवर्णपदक जिंकल्यानंतर पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला, ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्याने आता या खेळालाही आपल्या देशात प्राधान्य मिळू शकेल, अशी मला आशा आहे.

पदक जिंकल्यानंतरही अभिनव अतिशय शांत होता. कुठलाही अतिउत्साह जाणवू न देता तो म्हणाला, माझ्या या यशाने माझ्या भारताचा नावलौकिक जगात वाढला याचाच मला अभिमान आहे. यापुढेही मी कठोर मेहनत घेणे सुरूच करणार असून देशाला यापुढेही असेच आनंददायी क्षण मिळावेत, यासाठी प्रयत्नरत राहील.

वेबदुनिया वर वाचा