चीन सरकारने अब्जो रुपयांचा खर्च करत बीजिंग ऑलिंपिक सोहळ्याचे दिमाखदार उद्घाटन केले खरे, परंतु तिबेटी नागरिकांनी अभिनव पद्धतीने आंदोलन करत चीनच्या या सोहळ्यावर काहीवेळ सावली टाकण्याचा प्रयत्न केला.
बीजिंगमधील बर्ड नेस्ट मैदानावर भव्य लेजर शोने आसमंत उजळून निघाला असतानाच दुसरीकडे चीन आणि जगभरात विखुरलेल्या तिबेटी नागरिकांनी आपापल्या घरातील वीज दोन तास बंद करत चीनचा विरोध केला.
चीनने सुरू केलेल्या दमनसत्रा विरोधात तिबेटी नागरिकांनी या वर्षीच्या सुरुवातीपासूनच जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. चीन सरकारने तिबेटी नागरिकांवर अत्याचार सुरू केल्याचा आरोप काही मानवाधिकार संघटनांनीही केला आहे.