अभिनववर शुभेच्छा आणि बक्षिसांचा वर्षाव

वेबदुनिया

सोमवार, 11 ऑगस्ट 2008 (15:20 IST)
बीजिंग ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदाच भारताला सुवर्ण पदकाची चव चाखवणाऱ्या अभिनव बिंद्रावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

देशातील विविध राज्यांनी त्याला शुभेच्छा देतानाच त्याच्यावर बक्षीसांचा वर्षावही केला आहे. यात पंजाब सरकार अग्रेसर असून, मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी त्याला एक कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. बिहार सरकारनेही बिंद्राला 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

महाराष्ट्र सरकारनेही बिंद्राच्या या अभिनव कामगिरी बद्दल त्याचे कौतुक केले असून, त्याला 10 लाख रुपयांचा पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. मध्य प्रदेशामधील भाजप सरकारनेही अभिनवला पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

चंदिगड मधील अभिनवच्या घराबाहेर सध्या क्रीडा प्रेमी आणि त्याला शुभेच्छा देणाऱ्या त्याच्या चाहत्यांचा रांगा लागल्या आहेत.

संपूर्ण देशातून त्याच्या या कामगिरीचे कौतुक केले जात असून, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनीही अभिनवला आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा