सायना प्री क्वार्टरफाइनलमध्‍ये

वार्ता

रविवार, 10 ऑगस्ट 2008 (14:58 IST)
बिजींग- भारताची बॅडमिंटन सनसनी सायना नेहवाल हिने आपला जोरदार फॉर्म कायम ठेवत बिजींग ऑलम्पिक खेळांत रविवारी यूक्रेनच्‍या लारेसा जराइगा हिला पराभूत करून उपउपांत्‍य सामन्‍यात स्‍थान मिळविले आहे.

पहिल्‍या फेरीत सायनासाठी ही स्‍पर्धा कठीण असल्‍याचे वाटत असतानाच जोरदार खेळ करत तिने यूक्रेनी प्रतिस्‍पर्धीला 21-18, 21-10 ने मात दिली.

सायनाचा पुढचा सामना जागतिक क्रमवारीत तिस-या क्रमांकावर असलेल्‍या हॉंगकॉंगच्‍या चेन वॉंग आणि स्लोवाकियाच्‍या इवा स्लादेकोवा हिच्‍यात होणार आहे. सायनाने पहिल्‍या फेरीतला सामना 27 व्‍या मिनिटातच जिंकला.

वेबदुनिया वर वाचा