ऑलिंपिक उद्घाटनाला आता अवघे काही तासच बाकी असताना भारतीयांच्या आशा अधिक उंचावल्या आहेत. शनिवारी होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये भारतीय संघातील सात खेळाडू सहभागी होणार आहेत.
यात बॅडमेंटनमध्ये अनुप श्रीधर ला मार्कोस वेस्कोसेलोस, तर साएना नेहवाल ला रुसच्या एला डील काराचकोवाची झुंज द्यावी लागणार आहे. बॉक्सिंग खेळात विजेंदर आणि दिनेश कुमार यांची लढत होत आहे.
नेमबाजीत मानवजीत सिंधू, मानशेर सिंह, समशेर जंग, अवनीत कौर, यांचा कस पणाला लागणार आहे. पोहण्याच्या स्पर्धेत संदीप सेजवाल आणि नौकायनमध्ये एन एस जोल, बजरंग ठाकुर यांचा समावेश आहे.