अखिल कुमार आणि जितेंद्रने निराशा केल्यानंतर बॉक्सिंगमध्ये भारताच्या पदकाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या असून, 23 वर्षीय विजेंद्र ने 75 किलो मिडिलवेट प्रकारात इक्वेडोरच्या कार्लोस गोंगोरा याला सरळ सेटमध्ये धूळ चारली.
विजेंद्रने सुरुवाती पासूनच सुरेख खेळ करत कार्लोसवर आपला दबाव वाढवला होता. कार्लोसने प्रथम फेरीपासूनच बचावात्मक पावित्रा घेतला होता तर त्याचा बचाव भेदत विजेंद्रने त्याच्यावर अनेकदा मुष्टीप्रहार केला.
तिसऱ्या फेरीपर्यंत विजेंद्रने निर्णायक आघाडी घेतली आहे असे वाटत असतानाच अखेरच्या फेरीत मात्र कार्लोस काहीसा आक्रमक झाल्याने त्याच्या गुणांमध्ये वाढ झाली होती.
अखेरीस काहीसा बचावात्मक आणि आक्रमक खेळ करत विजेंद्रने कार्लोसला चीत केले आणि भारतीयांनी एकच जल्लोष केला.