बिजींगमध्‍ये अमेरिकन पर्यटकाची हत्या

वार्ता

रविवार, 10 ऑगस्ट 2008 (12:32 IST)
बिजींग- बिजींग ऑलम्पिकमध्‍ये सहभागी झालेल्‍या अमेरीकन खेळाडूच्‍या अमेरिकन नातेवाईकावर येथील एका स्थानिक नागरिकाने चाकू हल्‍ला करून खून केल्‍याची घटना शनिवारी घडली. या घटनेनंतर हल्‍लेखोराने आत्‍महत्‍या केली आहे. या हल्‍ल्‍यामागील कारण अदयाप समजू शकले नाही.

आंतरराष्‍ट्रीय ऑलम्पिक समितीने आणि स्थानिक पोलीस अधिका-यांनी सांगितले, की अमेरिकेतील बॅकमेन दाम्‍पत्‍य जेव्‍हा ऐतिहासिक ड्रम टॉवर पाहण्‍यासाठी गेले असताना एका स्थानिक नागरिकाने त्‍यांच्‍यावर हल्‍ला केला.

या हल्‍ल्‍यात टॉड बैकमेन हे जागीच ठार झाले. तर गंभीर रित्‍या जखमी झालेल्‍या बार्बरा बॅकमॅन आणि त्‍यांचा गाइड यांना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. पर्यटकांवर हल्‍ला केल्‍यानंतर हल्‍लेखोराने टॉवरवरून उडी मारून आत्‍महत्‍या केली.

वेबदुनिया वर वाचा