अभिनवची सुवर्णमयी कारकिर्द

वेबदुनिया

सोमवार, 11 ऑगस्ट 2008 (12:44 IST)
अवघ्या २६ वर्षाच्या असलेल्या अभिनव ब्रिंदाने ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवून तमाम भारतीयांची मान उंचावली आहे. त्याच्यातील गुणवत्ता खर्‍या अर्थाने हेरली ती लेफ्टनंट कर्नल जे. एस. धिल्लन यांनी. तेच त्याचे पहिले कोच होते.

नेमबाजीतही त्याने एअर रायफल गटात कौशल्य कमावले आहे. याच गटात त्याला सुवर्णपदक मिळाले आहे. २०००च्या ऑलिंपिक स्पर्धेतही तो सहभागी झाला होता. पण त्यावेळी त्याला यश मिळू शकले नव्हते. तेव्हा ऑलिंपिकमध्ये सहभागी होणारा तो सर्वांत लहान भारतीय खेळाडूही होता. पण या स्पर्धेतून तो जे शिकला ते त्याने बीजिंग ऑलिंपिकमध्ये कारणी लावले आणि सुवर्णपदकावर नाव कोरले.

अभिनवची ही सुवर्णमयी कामगिरी असली तरी त्याने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांतही तशी कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्याने सहा सुवर्णपदके पटकावली आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने दुहेरी गटात सुवर्ण व एकल गटात रौप्य पदक पटकावले होते. २००४ च्या ऑलिंपिकमध्ये त्याने ऑलिंपिक विक्रम मोडला. पण पदक मिळवू शकला नव्हता.

त्याच्या या सुवर्णमयी कामगिरीमुळेच त्याला २००१ मध्ये अर्जुन पुरस्कार आणि २००१ व ०२ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

नेमबाज असण्याबरोबरच अभिनवची शैक्षणिक कारकिर्दही धवल आहे. तो एमबीए आहे. शिवाय अभिनव फ्यूचरीस्टिक्स या कंपनीचा तो सीईओ आहे.

वेबदुनिया वर वाचा