New Year 2025 Wishes In Marathi: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
	
		
			 
										    		बुधवार,  1 जानेवारी 2025 (00:10 IST)
	    		     
	 
 
				
											आपले येणारे 12 महिने सुख मिळो, 
	52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत
	नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
	 
	जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर तुला मिळो,
	जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो
	या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा
	 
	सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुझं आयुष्य 
	चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब
	माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी कायम असतील
	नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
	 
	येणारं हे नववर्ष तुम्हा सगळ्यांना चांगलं जावो
	ईश्वराची कृपा तुमच्यावर राहो
	याच शुभेच्छा...
	 
	नवं वर्ष येवो घेऊन येवो सुखाचा प्रकाश, 
	नशिबाची दारं उघडावी,
	देव राहो तुमच्यावर प्रसन्न, 
	हीच प्रार्थना आहे देवाकडे तुमच्या चाहत्याची
	नववर्षाभिनंदन
	 
	नव्या वर्षाचं ध्येय 
	नव्या वर्षात फक्त नव्या गोष्टी मिळवणं नसून 
	नव्याने जगणंही आहे.
	नववर्षाभिनंदन
	 
	सर्वांच्या मनात सर्वांसाठी असावे प्रेम, 
	येणारा प्रत्येक दिवस आणो आनंदाचा क्षण, 
	नव्या उमेदीसोबत सगळं दुःख विसरून करा नव्या वर्षाला वेलकम.
	 
	फुल आहे गुलाबाचा, त्याचा सुवास घ्या. 
	पहिला दिवस आहे नववर्षाचा, त्याचा आनंद घ्या. 
	वर्ष येतं वर्ष जातं. पण या वर्षी तुम्ही सर्वांना आपलंस करुन घ्या.
	हॅपी न्यू ईयर
	 
	या नव्यावर्षात होवो आनंदाचा वर्षाव. 
	प्रेमाचा दिवस आणि प्रेमाची रात्र. 
	प्रेमळ हॅपी न्यू ईयर
	 
	हे नातं सदैव असंच राहो, 
	मनात आठवणींचे दिवे कायम राहो, 
	खूप प्रेमळ होता या वर्षीचा प्रवास, 
	अशीच राहो पुढील वर्षी आपली साथ.
	हॅपी न्यू ईयर
