देशात पहिल्यांदाच Xiaomi Mi A2 या स्मार्टफोनची विक्री सुरू होत आहे. दुपारी 12 वाजेपासून अमेझॉन आणि mi.com वरुन हा स्मार्टफोन खरेदी सुरु आहे. या फोनच्या मागच्या बाजूला 20 आणि 12 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. तर सेल्फीप्रेमींसाठी पुढील बाजूसही 20 मेगापिक्सल कॅमेरा आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 16 हजार 999 रुपये आहे. याशिवाय या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेलं व्हेरिअंटही असेल असं सांगण्यात येत आहे, मात्र या व्हेरिअंटची किंमत किती असणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. हा फोन खरेदी केल्यास रिलायन्स जिओकडून ग्राहकांना 4.5 टीबी अतिरिक्त डेटा देण्यात येत आहे. तसंच या फोनवर 2,200 रुपयांच्या इन्स्टंट कॅशबॅकची ऑफरही देण्यात आली आहे.