108 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह Xiaomi Mi 10 हा शानदार फोन 8 मे रोजी लॉन्च होणार

मंगळवार, 5 मे 2020 (12:13 IST)
‍ शिओमी कंपनीचा Mi 10 हा स्मार्टफोन भारतात 8 मे रोजी लॉन्च होणार आहे. कंपनीने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात मागील बाजूला तब्बल 108 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह चार कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आला आहे.
 
भारतात Mi 10 हा फोन 8 मे रोजी एका ऑनलाइन इव्हेंटद्वारे लॉन्च केला जाईल. Mi 10 हा फोन 31 मार्च रोजी लॉन्च केला जाणार होता. पण, करोना व्हायरसमुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने या फोनची लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आली होती. 
 
जाणून घ्या फीचर्स –
अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 वर कार्यरत
6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1080 x 2340 पिक्सल) डिस्प्ले
ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट
क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप म्हणजेच मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप
मुख्य कॅमेरा तब्बल 108 मेगापिक्सलचा
फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,780 एमएएच क्षमतेची बॅटरी
 
जाणून घ्या किंमत –
Mi 10 ची किंमत किती असेल याबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिलेली नाही. पण फोन प्रीमियम सेगमेंटमधील असून हा फोन महाग असण्याची शक्यता आहे. भारतीय चलनानुसार जवळपास चीनमध्ये या फोनच्या बेसिक मॉडेलची किंमत 42,400 रुपये आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती