शाओमिचा हा जबरदस्त फोन बाजारात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज

सोमवार, 27 मे 2019 (18:00 IST)
तुम्हाला मोबाईल वर जबरदस्त व्हिडियो गेम खेळण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी शाओमी कंपनीने भारतीय बाजारात एक खास स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याचे नाव ‘ब्लॅक शार्क 2’ असून हा मुख्यतः गेमिंग स्मार्टफोन आहे. या मोबाईल मध्ये पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी उत्तम दर्जाचे हार्डवेअर आहे. सोबतच स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसरशिवाय डायरेक्ट टच मल्टीलेयर लिक्विड कुलिंग फीचर देखील आहे. या फीचरद्वारे मोठे आणि ऑनलाइन गेम्स खेळतानाही फोन गरम होत नाही. ऑनलाइन संकेतस्थळ फ्लिपकार्टवर 12 जून रोजी दुपारी 12 वाजेपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
 
* या मोबाईलचे फीचर्स व किंमती 
 
बेसिक मॉडेल अर्थात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या व्हेरिअंटची किंमत 39 हजार 999 रुपये ,
 
प्रीमियम मॉडल (12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज) ची किंमत 49 हजार 999 रुपये 
 
फ्रोजन सिल्वर, ग्लोरी ब्ल्यू आणि शॅडो ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध 
 
स्मार्टफोनमध्ये गेमिंग आर्टिफिशियल इंटेलीजंसचा वापर
 
6.39 इंचाचा फुल एचडी+ (1080×2340) AMOLED डिस्प्लेचा वापर 
 
4,000 mAh क्षमतेची आणि फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी बॅटरी
 
ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप
 
एक 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे तर दुसरा 12 मेगापिक्सलचा
 
सेल्फीसाठी यामध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा 
 
स्क्रीनखाली फिंगरप्रिंट स्कॅनर  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती