सॅमसंग गॅलॅक्सी ए8 स्टार स्पेसिफिकेशन
फोनमध्ये 6.3 इंचाची फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले असून याचे रिझोल्यूशन 1080x2160 पिक्सल आहे आणि आस्पेक्ट रेशियो 18.5:9 आहे. डिस्प्ले वर 2.5D आणि 3D ग्लास प्रोटेक्शन आहे. सोबतच मेटल फ्रेम बॉडी आहे. फोनमध्ये क्वॉलकॉमचे स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर, एंड्रॉयड ओरियो 8.1, 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मिळेल. स्टोरेज 400 जीबी पर्यंत वाढवता येईल.
सॅमसंग गॅलॅक्सी ए8 स्टार कॅमेरा
फोनमध्ये ड्यूएल रिअर कॅमेरा आहे. याचा एक लेंस 16 मेगापिक्सल आणि दुसरा 24 मेगापिक्सलचा आहे. फ्रंट कॅमेरा 24 मेगापिक्सल असून फ्रंट कॅमेरा अपर्चर f/2.0 आहे. फ्रंट कॅमेर्यासह स्मार्ट ब्युटी, प्रो लाइटिंग आणि AR स्टिकर्स सपोर्ट मिळेल. फ्रंट कॅमेर्यासह फेस अनलॉक पर्याय देखील आहे.
कनेक्टिव्हिटीबद्दल सांगायचं तर यात 3700 एमएएच बॅटरी असून ड्यूएल सिम, 4जी वीओएलटीई, वाई-फाई, ब्लूटूथ 5, जीपीएस, फिंगरप्रिंट सेंसर, यूएसबी टाइप सी आणि 3.5mm हेडफोन जॅक मिळेल.