Redmi Note 11T 5G भारतात 30 नोव्हेंबर रोजी लॉन्च होईल, स्पेसिफिकेशन आणि किंमत जाणून घ्या
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (22:32 IST)
Redmi Note 11T 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे, ज्याची माहिती कंपनीने स्वतः शेअर केली आहे. हा स्मार्टफोन रेडमीच्या लेटेस्ट नोट सीरीजचा भाग आहे, ज्याचे नाव Redmi Note 11 आहे. Redmi Note 11 सीरीज अंतर्गत चीनमध्ये Redmi Note 11, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus असे तीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत. पण Redmi Note 11T 5G भारतात लॉन्च होणार आहे. असे सांगितले जात आहे की हा फोन Redmi Note 11 5G चे रीब्रँडेड वर्जन आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली आहे की Redmi Note 11 मालिका फोन भारतात 30 नोव्हेंबर रोजी लॉन्च केला जाईल.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर या Redmi फोनसाठी एक मायक्रोसाइट देखील तयार करण्यात आली आहे. यामध्ये आगामी स्मार्टफोनच्या फीचर्सची माहिती देण्यात आली आहे. यात 5G फीचर, झूमस्टर प्रोसेसर, फास्ट चार्जिंग, स्विफ्ट डिस्प्ले आणि रॅम बूस्टर हे फिचर देण्यात आले आहे. याशिवाय यात मजबूत लुक आणि शार्प कॅमेरा मिळेल. याशिवाय दुसरी कोणतीही माहिती नाही.
Redmi Note 11T 5G चे संभावित स्पेसिफिकेशन
Redmi Note 11T 5G बद्दल बोलायचे झाले तर हा फोन MediaTek डायमेंशन 810 चिपसेट सह येतो. तसेच, यात ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 2.4Ghz प्रोसेसर मिळू शकतो. आतापर्यंत समोर आलेल्या लीकवरून ही माहिती समोर आली आहे. Redmi च्या या मोबाईलमध्ये 6 nm प्रोसेसर वापरला जाऊ शकतो. तसेच, या आगामी डिव्हाइसला 8 GB LPDDR4X RAM आणि 128 GB UFS 2.2 स्टोरेज मिळेल. हा डिवाइस मल्टिपल स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये 6GB + 64GB, 6GB + 128GB आणि 8GB + 128GB चा पर्याय देण्यात आला आहे.
Redmi Note 11T 5G स्क्रीन
पुढील बाजूबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.6-इंचाचा फुलएचडी प्लस पॅनेल आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2400×1080 पिक्सेल आहे. तसेच यामध्ये 90hz रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा टच सॅम्पलिंग रेट 240hz आहे.
Redmi Note 11T 5G कॅमेरा सेटअप
कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे, जो अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. समोर 16- मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरला जातो.
Redmi Note 11T 5G बॅटरी
तसेच, या मोबाइल फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सोल्यूशनसह येते. आता कंपनीने त्याची लॉन्च तारीख जाहीर केली आहे आणि लॉन्च इव्हेंट दरम्यान किंमत देखील अधिकृतपणे जाहीर केली जाईल.