हा आहे सर्वात बेस्ट स्मार्टफोन, ज्याला मिळाली आहे 4.4/5 रेटिंग

मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (14:28 IST)
मोबाइल टेक्नॉलजी स्टार्टअप-वनप्लसचे स्मार्टफोन वनप्लस 3ला भारतीय उपयोगकर्त्यांनी अमेझॉन इंडियावर सर्वश्रेष्ठ स्मार्टफोनची रेटिंग दिली आहे. हा सन्मान त्या उपभोक्तांकडून मिळाला आहे, ज्यांनी भारतात फक्त अमेझॉनवर उपलब्ध वनप्लस 3 खरेदी केली आहे.  उपयोगकर्त्यांनी याला 4.4/5 रेटिंग दिली आहे, जी याच्या लाँच झाल्यानंतर या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध कुठल्याही स्मार्टफोनच्या तुलनेत जास्त आहे.  
 
वनप्लस 3ला भारतीय बाजारात जून, 2016मध्ये लाँच करण्यात आले होते. अमेझॉन इंडियाचे निदेशक (कन्झ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स) अरुण श्रीनिवासनने म्हटले, "आम्ही हे मान्य करतो की ग्राहकांचा रिव्ह्यू आणि उत्पादाची रेटिंग, उत्पादाची क्वालिटी आणि ग्राहकांची संतुष्टी मोजण्याची सर्वाधिक निष्पक्ष आणि प्रभावशाली माप आहे. वन प्लस टीमला बधाई की त्यांनी असा स्मार्टफोन तयार केला आहे, ज्याला संपूर्ण भारताच्या ग्राहकांनी पसंत केला आहे."
 
इंडिया वनप्लसचे महाप्रबंधक विकास अग्रवाल यांनी म्हटले, "आम्हाला हा सन्मान मिळाल्याबद्दल फारच आनंद आहे. वनप्लस 3ला मिडिया, उद्योग, उपयोगकर्ता आणि प्रशंसकांचे प्रोत्साहन मिळाले आहे.  
 
वनप्लस 3 अतुलनीय आहे, यात उत्तम डॅश चार्जिग तकनीक, शानदार डिझाइन आणि अत्याधुनिक विशेषता आहे. वनप्लस 3ने स्मार्टफोन बाजारात हलचल मचावली आणि प्रिमियम फ्लॅगशिप श्रेणीत नवीन मापदंड स्थापित केले आहे. ही रेटिंग विजेता उत्पादांच्या विकासासाठी  आपल्या कम्युनिटीच्या फीडबॅकला प्राथमिकता देण्याच्या आमच्या विश्वासाची पुष्टी करत आहे."
 
वनप्लस 3 मध्ये सहा जीबी रॅम, 16 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, आठ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, फुल एचडी रिझोल्यूशनसोबत ऑप्टिक एमोलेड कॅपेसिटिव टच स्क्रीन, अल्ट्रा-फास्ट सेरेमिक फिंगरप्रिंट स्कॅनर, एंड्रॉयड मार्शमैलो 6.0.1 सोबत ऑक्सिजन ओएस, क्वाड-कोर क्वालकोम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर आहे आणि हे अधिक वोल्टेसोबत 4जी ड्युअल नॅनो सिम कार्ड सपोर्ट करतो. भारतात वनप्लस 3चे दोन्ही वर्जन फक्त अमेजॉनडॉटइन वर 27,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 

वेबदुनिया वर वाचा