28 जानेवारी रोजी सॅमसंग गॅलॅक्सी एम 10 आणि एम 20 लॉचं होणार आहे

मंगळवार, 22 जानेवारी 2019 (15:14 IST)
28 जानेवारी रोजी सॅमसंग भारतीय बाजारात दोन इंडस्ट्री-फर्स्ट गॅलॅक्सी 'एम' स्मार्टफोन लॉचं करणार आहे, जे 5 मार्चपासून अमेझॅन.इन वर उपलब्ध होतील. उद्योग क्षेत्रातील स्रोतांकडून मिळालेल्या बातमीप्रमाणे एम 10 ची किंमत 7,990 रुपये आणि एम 20 ची किंमत 10,990 रुपये राहणार आहे. सॅमसंगने नवीन सिरींज सर्वात प्रथम भारतीय बाजारात लॉचं केली आहे. 'एम' सिरींज सॅमसंगच्या ऑनलाईन स्टोअरवर देखील उपलब्ध होईल. 'एम' सिरींजच्या स्मार्टफोनमध्ये प्रथमच इन्फिनिटी व्ही डिस्प्ले आणि मोठी बॅटरी क्षमता प्रदान केली आहे, जे तरुणांना लक्षात ठेवून नोएडास्थित सॅमसंगच्या फॅक्टरीत नवनिर्मित करण्यात आले आहे. ही फॅक्टरी जगातील सर्वात विशाल मोबाइल फोन फॅक्टरी आहे. नवीन श्रेणीमध्ये शक्तिशाली डिस्प्ले, कॅमेरा, बॅटरी आणि प्रोसेसर आहे. गॅलॅक्सी एम 20 मध्ये मोठी 5,000 एमएएच बॅटरी असेल, आणि एम 10 मध्ये 3,500 एमएएचची बॅटरी असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती