नोकिया 4.2 भारतात 10,999 रुपयांमध्ये लाँच

मंगळवार, 7 मे 2019 (16:22 IST)
नोकिया 4.3 ला कंपनीने भारतात लाँच केले आहे. हा फोन गूगलच्या एंड्रॉयड वन प्लॅटफॉर्मावर काम करतो. या फोनला कंपनीने फेब्रुवारीत मोबाइल वर्ल्ड काँग्रेसच्या दरम्यान लाँच केला होता. नोकिया 4.2 ची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे ज्यात 3GB + 32GB मिळेल. पण भारतात दोन जीबी रॅम असणारा वेरियंट लाँच करण्यात आला नाही.  
 
नोकियाच्या ये फोनमध्ये 5.7 इंचेची एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आली आहे, ज्यात वरच्या बाजुला एक वॉटरड्रॉप नॉच आहे. कंपनीने याला स्नैपड्रैगन 439 चिपसेटचा वापर केला आहे. बेक पॅनलची गोष्ट केली तर नोकिया 4.2 मध्ये फ्लॅश लाइट, एक 2.5 डी कर्व्ड ग्लास आणि फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. कॅमेर्‍याची गोष्ट केली तर फोनमध्ये डुअल कॅमेरा सेटअप मिळेल जो 13मेगापिक्सल+2मेगापिक्सलचे सेंसर आहे. सेल्फी प्रेमी आणि व्हिडिओ कॉलिंग  कॉलिंगसाठी यात 8 मेगापिक्कलचा सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन 3000 एमएएचच्या बॅटरीसोबत येतो. कंपनीने या फोनमध्ये एंड्रॉयड 9 पाई ओएस दिला आहे. हा फोन दोन रंगात येणार आहे, पहिला आहे काळा आणि दुसरा पिंक सैंड असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती