भारतात जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन लाँच

शनिवार, 15 जुलै 2017 (12:09 IST)
जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन  Yerha.com ने इलारी नॅनोफोन सी भारतात लाँच केला असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा जीएसएम फोन क्रेडिट कार्डच्या आकाराचा आहे. ज्याची किंमत भारतात 3 हजार 940 रुपये ठेवण्यात आली आहे. भारतात हा फोन ब्लॅक, रोज गोल्ड आणि सिल्वर कलरमध्ये उपलब्ध आहे. या फोनचं वजन 30 ग्रॅम आहे. हा फोन स्टायलिश, छोटासा आणि अँटी-मोबाईल स्मार्टफोन आहे. सक्रिय जीवनशैली असताना ज्यांना व्हर्च्युअल जगातून स्वतःला दूर ठेवावं वाटतं, अशांसाठी हा स्मार्टफोन तयार करण्यात आला असल्याचं कंपनीने सांगितलं. फोनला 1 इंच आकाराची स्क्रीन, मीडियाटेक MT6261D चिपसेट प्रोसेसर, 32 MB रॅम, 32 GB इंटर्नल स्टोरेज, ड्युअल सिम स्लॉट, 280mAh क्षमतेची बॅटरी, MP3 प्लेयर, FM रेडियो, फोन रेकॉर्डिंग अशी विशिष्ट्ये आहेत. 

वेबदुनिया वर वाचा