‘भीम’ अॅप लोकप्रिय झाले

मंगळवार, 3 जानेवारी 2017 (16:11 IST)
केंद्र सरकारचे अँड्रॉईड अॅप ‘भीम’ अॅप सर्वात लोकप्रिय झाले आहे. ‘भारत इंटरफेस फॉर मोबाईल’ अर्थात ‘भीम’ हे ऑनलाईन पेमेंट अॅप  सरकारने लाँच केले आहे.  सुमारे  30 लाखांपेक्षा जास्त यूझर्सनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे. सध्या हे अॅप फक्त अँड्रॉईडवर उपलब्ध असून लवकर अॅपल यूझर्सनाही ते अवेलेबल होईल. या अॅपला आतापर्यंत 4.1 रेटिंग मिळाले आहे. भीम अॅपच आता तुमची बँक असणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे अॅप तयार केले आहे. 

वेबदुनिया वर वाचा