500 रूपयाच्या मोबाइल रिर्चाजवरदेखील सरकराचा वॉच

सर्वसामान्य नागरिकांना नोटबंदीमुळे थोडा त्रास होत असला तरी अनेकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. 500 रूपयांच्या जुन्या नोटा काही ठिकाणी वापरण्यास सरकारने सूट दिली आहे.
 
जुन्या नोटा 15 डिसेंबरपर्यंत वापरता येणार आहेत. याचा फायदा घेत अनेक जण जुन्या 500 च्या नोटा घेऊन प्रीपेड मोबाइल रिर्चाज वाउचर खरेदी करत आहे. पण असे वाटत असेल की यावर कोणाचे लक्ष नाही पण सावधान, यावर सरकारचे सरळ लक्ष आहे. रिटेलरला अशा लोकांची माहिती देण्यास सरकारने सांगितले आहे, जे 500 चे रिचार्ज करत आहेत.
 
देशात एकूण 90 टक्के लोक प्रीपेड सेवा वापरतात. त्यामुळे जर अशा माध्यमातून कोणी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करत असेल तर सरकार अशा मोबाइल नंतरवर सरळ लक्ष ठेवून आहेत.

वेबदुनिया वर वाचा