‘लेनोवा’चा नवीन स्वस्त स्मार्टफोन, पहा काय आहे यात खास

बुधवार, 16 एप्रिल 2014 (12:17 IST)
चीनची मोबाईल हँडसेट कंपनी लेनोवोने नवीन स्मार्टफोन एस660 सादर केला आहे. आकर्षक फीचर्स आणि 3000 एमएएचच्या शक्तिशाली बॅटरीने चालणार्‍या या फोनला कंपनीने फारच स्वस्त किमतीत बाजारात आणला आहे. 
 
कंपनीच्या अधिकृत ई-स्टोअर आणि अन्य सर्व ऑनलाइन स्टोअर्सवर लेनोवाचा नवा स्माटफोन उपलब्ध करून देण्यात आला आहे.  
पर्सनल कॉम्प्युटर निर्माता 'लेनोवो' कंपनी स्मार्टफोनमध्येही आघाडीवर आहे. 'लेनोवो'ने भारतीय गॅझेट मार्केटमध्ये चांगली इमेज निर्माण केली आहे. 'Gartner'च्या एका अहवालानुसार, 2013 मध्ये मार्केट शेअरच्याबाबतीत 'लेनोवो' ही कंपनी जगात तिसर्‍या क्रमांकावर होती. 'लेनोवो'ची व्हाइब सीरीज भारतीय बाजारात लोकप्रिय ठरली होती. याशिवाय 'लेनोवो' टॅबलेट खूप मागणी आहे.   
या फोन (S660)मधील फीचर्स...  
डिस्प्ले-
 4.7 इंचाचा IPS डिस्प्ले स्क्रीन
 960X540 पिक्सल रेझोल्युशन 
 मात्र,  13,999 रूपयांत 720X1080 पिक्सल रेझोल्युशनचा डिस्प्ले असलेला मोबाइल सहज मिळत असल्याने यूजर्स नाराज होण्याची शक्यता. 
पॉवर-
न्यू S660 हा स्मार्टफोन 1.3 GHz क्वाड-कोर प्रोसेसरने अद्ययावत
1 GB रॅम 
अँड्रॉइड 4.2 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम
कॅमेरा
8 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा 
LED फ्लॅश
0.3 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
मेमरी आणि बॅटरी-
 8 GB इंटरनल मेमरी
32 GB पर्यंतच वाढवू शकता
3000 mAh बॅटरी
बाकी फीचर्स-
'लेनोवो' फोन ब्लूटूथ, वाई-फाई, GPRS, EDGE सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत. 

वेबदुनिया वर वाचा