स्मार्टफोन कम कॅमेरा लाँच

शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 (14:41 IST)
पॅनासॉनिक या कंपनीने नवा कॅमेरा-स्मार्टफोन लॉन्च केला आहे. जर्मनीतील कोलोनमध्ये आयोजित केलेल्या व्यापार्‍यांच्या संमेलनात हा फोन सादर करण्यात आला. हा फोन कम कॅमेरा आहे. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या या फोनमध्ये लेईका लेन्स आणि 1 इन सेन्सर लावण्यात आलं आहे. 20 मेगापिक्सेलचा सेन्सर फक्त पॅनासॉनिकच्या कॅमेर्‍यातच उपलब्ध असतो. 2.5 सेंटीमीटरच्या या सेन्सरमुळे कमी प्रकाशातही फोटो काढण्यास तसंच अल्ट्रा हाय डेफिनेशन (यूएचडी) व्हिडिओ बनवायलाही मदत होते. कंपनीच्या मते, वर्षाखेरीस ल्यूमिक्स डीएमसी-सीएम1 हा फोन जर्मनी आणि फ्रान्सच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. याची किंमत सुमारे 900 यूरो असेल, असा अंदाज आहे. सॅमसंग झूमला टक्कर देण्यासाठी पॅनासॉनिकने सीएम1 हा फोन बाजारात उतरवला आहे. सॅमसंग झूममध्येही मोठी लेन्स आहे. लेन्स, अँपेचर आणि शटर सेटिंग नियंत्रित करण्यासाठी धातूचं आवरण लावण्यात आलं आहे. मात्र यामुळे फोनची जाडी 21 मिमी होते, जी आतापर्यंतच्या कोणत्याही स्मार्टफोनच्या तुलनेत मोठी आहे. फोनची टचस्क्रीन 11.9 सेमी इतकी असून यात एक खास स्विच पण आहे. या स्विच दाबल्यावर तो कॅमेर्‍यासारखं काम करतं.
    

वेबदुनिया वर वाचा