व्हॉईस कॉलिंगसाठीही पैसे लागणार

सोमवार, 6 जुलै 2015 (11:16 IST)
व्हॉटस् अँपचे व्हॉईस कॉल सध्या फ्री आहेत. मात्र आता व्हॉईस कॉलसाठी पैसे द्यावे लागण्याची शक्यता आहे. इंटरनॅशनल कॉल्स आणि मेसेजेस फ्री असतील, मात्र नॅशनल कॉल्ससाठी पैसे द्यावे लागण्याची शक्यता आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने नेट न्यूट्रॅलिटीसाठी स्थापन केलेल्या समितीने यासंबंधी रविशंकर प्रसाद यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला आहे.
 
नेट न्यूट्रॅलिटीसंदर्भातील समितीने शिफारस केली आहे आहे की, व्हॉटस् अँप, वायबर, स्काईपसारखी ओव्हर द टॉप (ओटीटी) अँप्स इंटरनॅशनल कॉल्स आणि मेसेज फ्री देऊ शकतात. मात्र, लोकल आणि नॅशनल कॉल्ससाठी परवाना आवश्यक असायला हवा. मात्र, आतापर्यंत हे स्पष्ट केले गेले नाही की, नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉल्स वेगळे कसे केले जातील. समितीने हा अहवाल माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांना गेल्याच महिन्यात सादर केला आहे.
 
समितीने व्हॉटस् अँपबाबत केलेली शिङ्खारस ही अद्याप केवळ प्रस्तावित आहे. यावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. टेलिकॉम कंपन्या इंटरनॅशनल कॉल्समधून 8 टक्के, नॅशनल कॉल्समधून 18 टक्के आणि लोकल कॉल्समधून 56 टक्के एवढी कमाई करतात. एका मिनिटाच्या कॉलमधून टेलिकॉम कंपन्या तब्बल 40 ते 50 पैसे कमाई करतात, मात्र व्हॉटस् अँप व्हॉईस कॉलमधून 1 मिनिटात केवळ 4 पैसेच मिळतात. 

वेबदुनिया वर वाचा