लाँच झाला सर्वात स्वस्त 4जी स्मार्ट फोन

बुधवार, 8 जून 2016 (17:47 IST)
इंटेक्सने आपला 4जी स्मार्टफोन क्लाउड ग्लोरी लाँच केला आहे. कंपनीने या फोनची किंमत 3999 रुपये ठेवली आहे. या फोनच्या विक्रीसाठी कंपनीने फ्लिपकार्टशी करार केला आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये उपलब्ध आहे.  
 
काय आहे खास फीचर्स : इंटेक्स क्लाउड ग्लोरीमध्ये 4.5 इंचीचा आयपीएस डिस्प्ले स्क्रीन आहे ज्याचे रेजोल्यूशन 480×854 पिक्सल आहे. या 4जी स्मार्टफोनमध्ये एंड्रॉयड 6.0 मार्शमैलो ऑपरेटिंग सिस्टम आहे. फोनमध्ये 1.2 गीगाहर्ट्‍जचा मीडियाटेक एमटी6735 एम क्वॉड कोर प्रोसेसर आहे. तसेच 1 जीबी रॅम आहे. यात 8 जीबीची इंटर्नल स्टोरेज क्षमता आहे ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 32 जीबी पर्यंत वाढवू शकता.   
 
कसा आहे फोनचा कॅमेरा : फोटो काढण्यासाठी फोनमध्ये ड्‍यूल एलईडी फ्लॅशसोबत 5 मेगापिक्सलचा रियर आणि सेल्फी क्लिक करण्यासाठी 2 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा एक डुअल सिम स्मार्टफोन आहे. याचे वजन 120 ग्रॅम आहे.

वेबदुनिया वर वाचा