विंडोज 7, विंडोज 8.1 चे अपग्रेडेशन विंडोज 10 मध्ये मोफत करून घेण्याची सुविधा कंपनीने या सॉफ्टवेअर युजरना दिली आहे. ही सुविधा वर्षभरासाठी असली तरी ती लॅपटॉप, डेस्कटॉपबरोबरच विंडोज स्मार्टफोनसाठीही दिली जाणार आहे. विंडोज 10 लवकरच बाजारात दाखल होत आहेत. कंपनीचे अधिकारी टेरी मेयरसन या संदर्भात माहिती देताना म्हणाले, आजपर्यंत युजरला एक वेळाच मोठी रक्कम भरून विंडोज सिस्टीम खरेदी करावी लागत होती मात्र आता सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये विंडोज उपलब्ध करून दिल्या जात आहेत.