भारतात आपले दोन नवे फोन गॅलेक्सी ए5 आणि गॅलेक्सी ए7 स्मार्टफोन निर्माण करणार्या सॅमसंग कंपनीने भारतात लॉन्च केले आहेत. कंपनीने हे फोन मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये सुरु असलेल्या एका इव्हेंटमध्ये लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी ए5 ची किंमत 29,400 रुपये आहे तर गॅलेक्सी ए7 ची किंमत 33,400 रुपये आहे.
गॅलेक्सी ए5 चा डिस्प्ले 5.2 तर गॅलेक्सी ए7 चा डिस्प्ले 5.5 इंच आहे. गॅलेक्सी ए5 मध्ये 2जीबी रॅम आणि 2900 मिलीअँम्पिअर क्षमतेची बॅटरी आहे, तर गॅलेक्सी ए7 मध्ये 3जीबी रॅम आणि 3300 मिलीअँम्पिअर क्षमतेची बॅटरी आहे.