भारतात ब्लॅकबेरी क्लासिकच्या किमतीची घोषणा

शुक्रवार, 16 जानेवारी 2015 (15:46 IST)
ब्लॅबेरीने भारतात आपले नवीन हँडसेट क्लासिकच्या किमतीची घोषणा केली आहे. BB 10 OS वर आधारित या फोनची किंमत 31,990 रुपये आहे आणि हे मुख्य करून स्नॅपडीलवर उपलब्ध आहे. 

ब्लॅकबेरी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 1.5 जीएचझेड डुअल कोर प्रोसेसरचे आहे. हा ब्लॅकबेरीच्या आपल्या ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. यात 2जीबी रॅम आणि 16 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे.  

हा फोन देखील ब्लॅकबेरीच्या इतर हँडसेटप्रमाणे आहे आणि यात क्वर्टी कीबोर्ड आणि ऑप्टिकल ट्रॅक पॅडपण आहे. याचे स्क्रीन 3.6 इंचीचा  टीएफटी एलसीडी स्क्रीन असून त्याला गौरीला ग्लास प्रोटेक्शन मिळालेले आहे. याचे वजन 178 ग्रॅम आहे आणि हे 10.2 मिमी जाड आहे.  

याचा कॅमेरा 8 एमपीचा आहे आणि व बॅटरी 3 'जी'वर 17 तासांचा टॉक टाइम देण्यात सक्षम आहे. 

वेबदुनिया वर वाचा