फक्त करा गोंधळ आणि सेल्फी आपोआप क्लिक!

गुरूवार, 4 जून 2015 (11:26 IST)
स्मार्टफोनद्वारे सेल्फी काढणार्‍यांसाठी एक जबरदस्त अँप आलं आहे. ज्याद्वारे आपण फक्त गोंधळ घालायचा, ओरडायचं आणि सेल्फी  आपोआप काढली जाईल. अँपलच्या स्मार्टफोनसाठी तयार केलेलं हे कॅमेरा अँप ‘ट्रिगरट्रॅप सेल्फी’ आवाजाच्या आधारानं फोनचा कॅमेरा ऑन करते.
 
या अँपला कॅमेर्‍यासाठी ट्रिगर बनवणारी कंपनी ट्रिगरट्रॅपनं तयार केलंय. वेबसाइट शिींरळिुशश्र.लेा नुसार या अँपच्या मदतीनं सेल्फी घेणं खूप सोपी आहे. आपल्याला फक्त फोन सेल्फीच्या पद्धतीत धरावा लागेल आणि ओरडावं लागेल. आपलं ओरडणं ऐकून फोन स्वत: कॅमेरा ऑन करेल आणि आपली सेल्फी काढली जाईल. सेल्फी काढल्यानंतर हे अँप आपल्या सेल्फीचा प्रिव्ह्यू दाखवेल आणि दुसरी सेल्फी  काढण्यासाठी स्क्रीन क्लिअर करण्यासाठी आपल्याला पुन्हा थोडासा गोंधळ घालावा लागेल, आवाज करावा लागेल. ट्रिगरट्रॅपनुसार ओरडण्याचा आवाज काही ठरावीक डेसिबलमध्ये ऐकू आल्यास स्मार्टफोनचा पिक्सेलेटेड स्क्रीन साफ होतो आणि कॅमेरा सेल्फी काढतो. या अँपमध्ये स्मार्ट फेस डिटेक्शन प्रणाली सुद्धा आहे. म्हणजे आपलं ओरडणं ऐकून कॅमेरा तेव्हाच सेल्फी काढतो, जेव्हा कोणता चेहरा दिसेल.

वेबदुनिया वर वाचा