पॅनासोनिकचा इलुगा सीरिज स्मार्टफोन

सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (17:22 IST)
जपानी कंपनी पॅनासोनिकने आपला इलुगा सीरिज स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. हा इलुगा ए आणि ड्युअल सिम फोन असून १.२ जीएचझेड कॉडकोर स्नॅपड्रॅगन २00 प्रोसेसर वर चालतो. हा विशेष डिझाइन केलेला असून डबल टॅप टेक्नॉलॉजीपासून बनवलेला आहे. म्हणजे स्क्रीनवर दोन वेळा टॅप केल्यावर हा चालू होतो. शिवाय यात फिट होम यूआय आहे, ज्यामुळे तुम्ही एका हातानेही तो हाताळू शकता. याची विशेषत: म्हणजे यात आवाज वाढवण्यासाठी आणि आवाज स्पष्ट येण्यासाठी विशेष टेक्नॉलॉजी वापरली आहे. यात हिंदी, मराठी, तमीळ, तेलुगू आणि बंगाली भाषेचा पर्याय आहे.
 
वैशिष्ट्ये : 
 
* स्क्रीन- ५ इंच (८५४ बाय ४८0 पिक्सल) आईपीएस डिस्पले * प्रोसेसर- १.२ जीएचजेड क्वॉड कोर स्नॅपड्रॅगन २00 प्रोसेसर * सिम- ड्युअल सिम
 
* रियर कॅमेरा- ८ मेगापिक्सल, एलईडी फ्लॅश सोबत
 
* फ्रंट कॅमरा- १.३ मेगापिक्सल 
 
* रॅम- १ जीबी, ४ जीबी इंटरनल स्टोरेज * जाडी- ९२ मिमी * अन्य फीचर- ३जी, वाई-फाई, ब्ल्यूटूथ
 
* बॅटरी- २000 एमएएच * रंग- सफेद, काळा 

वेबदुनिया वर वाचा