नवा टॅब खरेदी करताय?

बुधवार, 3 फेब्रुवारी 2016 (09:23 IST)
खिसा जास्त हलका न करता स्वस्तातला टॅब विकत घेण्याच्या विचारात असाल तर काही गोष्टींकडे लक्ष द्यायला विसरू नका.  
 
1. टॅबची किंमत कमी करताना काही अॅप्सना कात्री लावली जाते. काही टॅब्समध्ये गुगल अॅपही नसतात. अशा वेळी गुगल प्ले स्टोअर इंस्टॉल आहे ना, याची खाची करून घ्या. 
 
2. प्रोसेसरची क्षमता तपासून पहा. टॅब स्लो नाही ना, याची खात्री करून घ्या. 
 
3. स्वस्त टॅबमध्ये इंटर्नल मेमरी स्पेस कमी असण्याची शक्यता असते. टॅब खरेदी करताना त्यात कमीत कमी आठ जीबी इनबिल्ट मेमरी असेल याची काळजी घ्या. 
 
4. स्वस्त टॅबचा रेअर कॅमेरा स्क्रॅचप्रूफ आहे ना, हे बघून घ्या. 
 
5. स्वस्त टॅबलेट घेण्याचा नादात डिस्प्ले क्वॉलिटीशी तडजोड करू नका. 
 
6. टचस्क्रीन डिव्हाइस विकत घेण्याआधी स्क्रीन तपासून घ्या. 
 
7. लो बजेट डिव्हाइस विकत घेताना त्यातल्या सॉफ्टवेअरची माहिती घ्या.   

वेबदुनिया वर वाचा