दोन स्क्रीनचा योटाफोन 2 लॉन्च

सोमवार, 8 डिसेंबर 2014 (17:02 IST)
रशियाची कंपनी योटा डिव्हाईसेसने नुकतेच लंडनमधील एका इव्हेंटमध्ये कंपनीचा दोन स्क्रीनचा योटाफोन 2 लॉन्च केला आहे. हा फोन त्याच्या युनिक डिझाइनमुळे चर्चेत आहे. योटाफोन 2 मध्ये स्क्रीन ई-पेपर डिस्प्ले असा आहे.
 
वारंवार वाढत असलेल्या स्मार्टफोन मार्केटमध्ये आता युनिक डिझाईनचे स्मार्टफोनच जास्त लोकप्रिय होत आहेत. या फोनमध्ये बॅक कव्हर देण्यात आले आहे. ज्यामुळे आर्धी स्क्रीन झाकली जाते. जसे तुम्ही स्क्रीन कव्हरवर टॅप करता तसे अर्धा उघडय़ा स्क्रीनवर तुम्हाला व्हर्च्यूअल डोळे दिसायला लागतात आणि हे कोणत्याही व्यक्तीचा वेगवेगळा मूड दाखवतात. यामध्ये रागात, मस्ती करताना, वटारताना, फिरताना असे वेगवेगळे एक्स्प्रेशन दाखवले जातात. 
 
फीचर्स-5 इंच स्क्रीन, 720*1280 पिक्सल रेजोल्यूशन, 1.2 GHZ  क्वाड-कोर प्रोसेसर, 16 GB  इंटरनल मेमोरी, 1.5 GB रॅम, 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा, 2.1 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, अँड्रॉइड 4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम, 2610 mh बॅटरी. 

वेबदुनिया वर वाचा