दीर्घकाळ चालणारा स्मार्टफोन नोकिया १३0

मंगळवार, 4 नोव्हेंबर 2014 (15:15 IST)
स्मार्टफोन किंवा फिचर फोनच्या बॅटरीची समस्या अनेक यूर्जससाठी डोकेदुखी ठरत आहे. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर वारंवार येणार्‍या कॉलमुळे बॅटरी लवकर संपते. ही बाब लक्षात घेऊन मायक्रोसॉफ्ट डिव्हायसेस-नोकियाने ड्युएल सिम मोबाईल फोन आणला आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे याची बॅटरी. मायक्रोसॉफ्ट नोकिया १३0 असे या फोनचे नाव असून हा एकदा चार्ज केल्यानंतर याची बॅटरी तब्बल ३६ दिवस टिकते, असा दावा कंपनीने केला आहे.

एकदा चार्ज केल्यानंतर २ नेटवर्कवर चालणार्‍या या फोनमध्ये १३ तासांचा टॉकटाईम, ४६ तासांचा म्युझिक प्लेबॅक आणि १६ तासांचा व्हिडीओ प्लेबॅक मिळेल. जे पहिल्यांदाच मोबाईल फोन खरेदी करणार आहेत, त्यांच्यासाठी हा फोन अतिशय उत्तम असल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे. स्मार्टफोनच्या रूपात पाहायचं झालं, तर युझर्सना यामध्ये केवळ गाणी आणि व्हिडीओ मिळणार आहेत. नोकिया नावाने येणारा हा शेवटचा फोन आहे. या फोनची किंमत अवघी १६४९ रुपये इतकी आहे.

वेबदुनिया वर वाचा