जियोनीने सादर केले ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन ‘एफ103’

मंगळवार, 13 ऑक्टोबर 2015 (13:38 IST)
चीनच्या मोबाइल फोन कंपनी जियोनीने भारतात तयार केलेला आपला पाहिला स्मार्टफोन ‘एफ103’ सादर केला आहे. याच बरोबर कंपनीने विनिर्माण योजनेच्या अंतर्गत 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. विशाखापट्टणममध्ये आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्या उपस्थितीत जियोनी इंडियाचे सीईओ अरविंद वोहरा व जियोनीचे अध्यक्ष विलियम लू यांनी हा फोन सादर केला.   कंपनीसाठी हा फोन इलेक्ट्रॉनिक्स विनिर्माता फाक्सकॉनने श्रीसिटीत तयार केला आहे. कंपनी 2015-16मध्ये बिक्री दुप्पट करण्याचे लक्ष्य घेऊन चलत आहे. 
 
एफ103 मध्ये 1.3 गीगाहर्ट्ज क्वाडकोर प्रोसेसर आहे.
 
यात 2जीबीची रॅम आहे आणि हा 4जी फोन आहे. 
 
महत्त्वाचे म्हणजे कंपनी आयतीत ‘एफ103’आधीपासूनच विकत होती पण ती आता ‘मेड इन इंडिया’ संस्करण विकेल. याची किंमत 9,999 रुपए आहे. कंपनीने म्हटले की पुढील वर्षात मार्चपासून भारतात विक्री होणारे सर्व 4जी स्मार्टफोन येथेच तयार होतील.

वेबदुनिया वर वाचा