क्रिओचा मार्क 1 स्मार्टफोन भारतात आला

शुक्रवार, 15 एप्रिल 2016 (11:37 IST)
मीडिया स्ट्रमिंग स्टीक टीवे अशी ओळख असलेल्या क्रिओ कंपनीने त्यांचा सी 490 स्मार्टफोन भारतात मार्क वन नावाने सादर केला आहे. या फोनसाठी अँड्रॉईड 5.1.1 वर आधारित फ्यूल ओएस दिली गेली आहे. या ओएसच्या माध्यमातून कंपनी दर महिन्याला नवीन फीचर्स अँड करणार आहे. फोनची किंमत 19999 रूपये आहे व तो फ्लिपकार्ट तसेच कंपनीच्या साईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
 
या फोनसाठी साडेपाच इंचाचा क्वाड एचडी डिस्प्ले दिला गेला असून डिस्प्लेवर तसेच बॅक साईडला कोर्निग गोरिल्ला ग्लास थ्री प्रोटेक्शन दिले गेले आहे. हा फोन डय़ुल सिम असून त्याला 3 जीबी रॅम, 32 जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या साहाय्याने 128 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. फोनला 21 एमपीचा बॅक कॅमेरा एलईडी फ्लॅशसह दिला गेला आहे. तो 4 के पर्यंतचे व्हिडिओ बनवू शकतो. ङ्ख्रंट कॅमेरा 8 एमपीचा आहे व तोही ङ्खुल एचडी व्हिडिओ बनवू शकतो. ङ्खोरजी, एलटीई, वायङ्खाय, ब्ल्यू टूथ, जीपीएस अशी कनेक्टीव्हीटी ऑप्शन्स आहेत शिवाय युजर फोनच्या कडेवरही टेक्स्ट लिहू शकतो. कंपनीने त्यांचे पुढचे अपडेट 13 मे रोजी येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यातून युजरला फोटो एडिटर, ईको मेसेज, सेल्फी स्क्रीन फ्लॅश अशी फीचर्स मिळणार आहेत. 

वेबदुनिया वर वाचा