आय फोनला उत्तर ते कमी किंमतीत

शुक्रवार, 16 सप्टेंबर 2016 (18:03 IST)
भारतात आपली गॅलॅक्सी ए सीरीजचा विस्तार करत दक्षिण कोरियाई दिग्गज कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने शुक्रवारी गॅलेक्झी ए9 प्रो स्मार्टफोन लाँच केला, ज्याची किंमत 32,490 रुपये एवढी आहे. सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष (मोबाइल व्यापार) मनू शर्मा यांनी म्हटले, “एसएमोलेड डिस्प्ले असणारा व या सहा इंच स्क्रीन असणार्‍या या फोनला जास्त मेमरी आणि अॅडवांस प्रोसेसरने युक्त   करण्यात आला आहे, ज्याने बरेच काम एकदम केले तरी तो मंद पडणार नाही.”
 
गॅलॅक्सी ए9 मध्ये काच आणि धातूचे एकीकृत संयोजनामुळे याला शानदार लुक मिळत आहे. याच्या स्क्रीनला गोरिल्ला ग्लास 4ने सुरक्षित करण्यात आले आहे आणि हे फुल एचडी स्क्रीन आहे. याचा बेस फक्त 2.7 एमएम पातळ आहे.  
 
गॅलॅक्सी ए9 प्रो मध्ये 5,000 एमएएचची बॅटरी लागली आहे, जो 160 मिनिटात पूर्ण चार्ज होते.  
 
यात चार जीबी रॅम आहे आणि हा स्नॅपड्रेगन 64 बिट ऑक्टाकोर प्रोसेसरयुक्त आहे. यात दोन सिम कार्ड लावू शकता व माइक्रो एसडी कार्डसाठी एक अतिरिक्त पोर्टपण आहे, जो 256 जीबी मेमरीला स्पोर्ट करतो.  
 
यात 16 मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि आठ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. हा तीन रंग सोनेरी, काळा आणि पांढर्‍या रंगात उपलब्ध आहे. हा 26 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे.  

वेबदुनिया वर वाचा