अंगठा दाखवा, सिम घ्या

नवी दिल्ली- सरकारने सिम खरेदी करण्यासाठी दस्तऐवजांची जमवाजमवीहून वाचण्यासाठी एक नवीन सुरुवात केली आहे. केवळ आधार कार्ड आणि फिंगरप्रिंटच्या मदतीने आपण सिम कार्ड खरेदी करू शकता. सरकारने e-KYC (इलेक्ट्रॉनिक नो योर कस्टमर) सर्व्हिसची सुरुवात केली आहे.
 
याच्या मदतीने सिमसाठी अॅप्लिकेशन आणि ऑथेंटिकेशन ऑनलाईन करण्यात येईल. याने कस्टमरला कमीत कमी वेळेत अॅक्टिवेट सिम मिळू शकेल. e-KYC मध्ये यूजरला आपला आधार नंबर आणि बॉयोमैट्रिक इंप्रेशन (अंगठ्याचे सत्यापन) द्यावे लागेल. आधार क्रमांकच्या मदतीने यूजरचे नाव आणि पत्ता या सारखी माहिती टेलिकॉम कंपन्यांना प्राप्त होऊ शकेल.

वेबदुनिया वर वाचा