7th Day of Navratri शारदीय नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. या दिवशी माता कालीचे विशेष पूजन होतं आणि मंत्रांचा जप केल्याने देवी प्रसन्न होऊन सर्वत्र विजय प्रदान करते. जाणून घ्या कालरात्री पूजन विधी आणि विशेष मंत्र- Maa kalratri puja vidhi and mantra
ही देवी सर्व प्रकाराचे रोग दूर करणारी, विजय वरदान देणारी, सर्व विकार दूर करणारी देवी मानली जाते. या देवीची आराधना करुन देवीला गुळाचा नैवेद्य दाखवावा. प्रसाद आपण ही ग्रहण करावा ज्याने आरोग्यावर चांगले परिणाम होतात.
कालरात्री देवी पूजन विधी Maa Kalratri Puja vidhi
- नवरात्रीच्या सप्तमी तिथीला कालरात्री पूजन करण्यासाठी सकाळी उठून आधी स्नान करावे.
- आता देवीला कुंकु, अक्षता, दीप, धूप अर्पित करावं.
- देवीला रातराणीचे फुलं अर्पित करावे.
- गुळाचा नैवेद्य दाखवावा.
- देवीची आरती करावी.
- यासोबतच दुर्गा सप्तशती, दुर्गा चालीसा व मंत्र जाप करावा.
- या दिवशी लाल चंदन माळने देवी मंत्र जप करावा.
- लाल चंदन माळ उपलब्ध नसल्यास रूद्राक्षाच्या माळीने जप करावा.
पंचमेवा, खीर, पुष्प, फळ इत्यादीची आहुती द्या. दिलेले सर्व मंत्र शास्त्रीय आहेत आणि अनेक श्री दुर्गा सप्तशतीमधून उद्धृत केलेले आहेत.
- 'ॐ फट् शत्रून साघय घातय ॐ।'
स्वप्नदृष्टीचे फळ अनेक शास्त्रात सांगितले आहे. ज्याचे फळ अशुभ आहे असे स्वप्न दिसल्यास त्यावर उपाय म्हणून सकाळी जपमाळ केल्यास अशुभ फळाचा नाश होतो व शुभ फळ मिळते.