Navratrotsav Bijasan Mata Mandir Indore : बिजासन देवी मंदिर इंदूर

सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (21:31 IST)
Navratrotsav Bijasan Mata Mandir Indore: काही दिवसांवर नवरात्रोस्तव येऊन टिपले आहेत.आज आम्ही इंदूर च्या बिजासन माताच्या मंदिराची माहिती देत आहोत. बिजासन माता मंदिराचा इतिहास एक हजार वर्षांचा आहे. वैष्णो देवी प्रमाणे येथे मातेची दगडी पिंडी आहेत.ही पिंडी स्वयंभू असल्याचे मंदिराचे पुजारी म्हणतात. येथे देवीची नऊ रूपे आहेत. एके काळी या मंदिराच्या आजूबाजूला काळ्या हरणांचे जंगल होते  आणि हे तंत्र-मंत्र, सिद्धी यासाठी खास ओळखले जाते. पूर्वी चौथऱ्यावर देवीआई वसलेली असायची. कालांतरानंतर हे मंदिर इंदूरचे महाराज शिवाजीराव होळकर यांनी 1760 मध्ये बांधले होते.ही देवी नवसाला पावणारी आहे. 
 
वैशिष्टय़ :
 बिजासन माता ही सौभाग्यदायी आणि अपत्यदेणारी मानली जाते. यामुळे लग्नानंतर राज्यातूनच नव्हे तर देशभरातून नवविवाहित जोडपे देवीच्या दर्शनासाठी आणि पूजा करण्यासाठी येतात. मांडूच्या राजाचा पराभव करण्यासाठी अल्हा-उदलनेही आईकडून नवस मागितला होता, असे म्हणतात.
 
बांधकाम-
 तत्कालीन होळकर शासकाने साध्या मातीच्या, दगडी चौथऱ्यावर बसलेल्या मातेच्या नऊ रूपांसाठी येथे मराठा शैलीत मंदिर बांधले होते. नंतर अनेक विकासकामे झाली. मंदिराच्या आवारात एक पवित्र तलाव आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात मासे आहेत. या माशांना खाऊ घातल्यावर पुण्य मिळते अशी आख्यायिका आहे. ही देवी नवसाला पावणारी आहे. 
 
कहाणी-
एका आख्यायिकेनुसार, टेकडीवर स्थित दैवी स्थाने ही सिद्धींचे आवाहन करण्यासाठी आणि त्यांना जागृत करण्यासाठी सर्वोत्तम स्थान आहेत. इंदूरच्या बिजासन माता मंदिरातील नऊ दिव्य मूर्तींना तंत्र-मंत्राचे चमत्कारिक स्थान आणि सिद्धपीठ मानले गेले आहे.
 
एकेकाळी बुंदेलखंडचा अल्हा-उदल आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला  मांडूचा राजा कडंग राय पासून घेण्यासाठी येथे आला, तेव्हा त्याने  बिजासनच्या  मातीच्या चौथऱ्यावर वसलेल्या देवीआई ची विधी विधानाने पूजा करून या सिद्धिदात्री नऊ दिव्यांना प्रसन्न केले आणि आईचे आशीर्वाद घेतले. तेव्हापासून देवीला बिजासन माता म्हणून ओळखले जाते.
 
मंदिराच्या मागील बाजूस नाहर खोदरा नावाचा जलाशय आहे. असे म्हणतात की प्राचीन काळी सिंह येथे पाणी पिण्यासाठी येत असे आणि देवीच्या मंदिराजवळ काही वेळ उभे राहिल्यानंतर कोणालाही त्रास न देता परत जात असे. 
 
या प्राचीन सिद्धी स्थळावर व्यासपीठावर बसलेल्या देवींचे भव्य मंदिर व्हावे या उद्देशाने श्रीमंत महाराजा शिवाजीराव होळकर यांनी मंदिराच्या नूतनीकरणाचा विचार केला.देवीच्या मंदिराचे काम भिंती बांधण्यापासून सुरू झाले, मात्र रात्रीच्या वेळी भिंती पडायच्या, असे काही वडीलधारी सांगतात.
 
दोन-तीन दिवस कोणाच्याही लक्षात आले नाही, पण महाराजांना ह्या गोष्टीचा नक्की त्रास झाला. तेव्हा बिजासन मातेने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिले आणि सांगितले की काही नवस करा नंतर ते नवस फेडायचे म्हणून मंदिराची बांधणी करा. 
 
त्यानंतर महाराजांना मुलगा व्हावा, अशी इच्छा केली. महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय यांचा जन्म झाल्यावर त्यांनी सोन्याच्या विटा ठेवून मंदिराचे बांधकाम सुरू केले. नवरात्रीच्या वेळी श्रीमंत तुकोजीराव होळकर तृतीय यांच्यासह संपूर्ण राजघराणे देवीच्या पूजेसाठी बँडवाद्यांसह तेथे उपस्थित असायचे.
 
मंदिराशी संबंधित कार्यक्रम -
 चैत्र आणि शारदीय नवरात्रीत मंदिरात जत्रा भरते. एका अंदाजानुसार, नवरात्रीच्या काळात देशभरातून 3 लाखांहून अधिक भाविक येथे दर्शन आणि पूजेसाठी येतात. दरवर्षी नवरात्रोत्सवात येथे जत्रा भरते. 
 
कसे जायचे -
इंदूर रेल्वे स्थानकापासून अंतर: शहराच्या पश्चिम विभागात वसलेले हे मंदिर रेल्वे स्थानकापासून 9.8 किलोमीटर अंतरावर आहे. येथे पोहोचण्यासाठी सुमारे 27 मिनिटे लागतात.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती