Navratri shopping tips : नवरात्रीसाठी अशा प्रकारे खरेदी करा

शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (21:25 IST)
नवरात्री खरेदीसाठी टिप्स :यंदा कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळानंतर नवरात्रोत्सवाची वेगळाच उत्साह आणि जय्यत तयारी सुरु आहे. बाजारपेठ सर्व वस्तूंनी भरले आहे. चनियाचोली, दागिने, आणि विविध वस्तुंनी बाजारपेठ सजले आहे. यंदाच्या वर्षी फ्युजन ट्रेंड पाहायला मिळत आहे. महिलांची धोती, पॅन्ट, घेरदार सदऱ्याची मागणी वाढली आहे. सध्या ऑक्सिडाइज दागिन्यांचा खप वाढला आहे. तसेच दागिन्यांमध्ये आरसा, लाख, जूट, मनी , धागा, पासून बनवलेले दागिन्यांना मागणी आहे. हे दागिने 500 ते 1500 रुपयां पर्यंत मिळतील.
 
तसेच एल्युमिनियम पासून बनलेले दांडियाना मागणी आहे. ते 50 ते 100 रुपयांपर्यंत मिळतील.  नवरात्रोत्सवासाठी 1000 ते 2000 पर्यंत रुपयांपर्यंत ड्रेस मिळतील. एकंदरीत नवरात्रोत्सवाची खरेदी 2000 ते 3000 पर्यंत होऊ शकेल.  दोन वर्षानंतर नवरात्रोत्सवाच्या सणाचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती