Navratri 2022: आज 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या दिवसात लोक दुर्गामातेची पूर्ण विधीपूर्वक पूजा करतात आणि उपवास करतात. पण ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीत लसूण, कांदा यांसारखे पदार्थ खाण्यास मनाई आहे. तर जाणून घ्या नवरात्रीमध्ये लसूण आणि कांद्याचे सेवन का करू नये .
पूजा करताना माणसाचे मन शुद्ध असले पाहिजे असे मानले जाते. त्यामुळे पूजेच्या वेळी सात्विक आहार घेणे श्रेयस्कर आहे. यामुळे तुमचे मन भगवंताच्या उपासनेत पूर्णपणे लीन होते. दुसरीकडे, कांदा आणि लसूण सेवन केल्याने तुमचे मन अशुद्धतेने भरते.