नवरात्र विशेष : उपवासाची पुरी त्वरित बनवा फक्त या सोप्या पद्धतीने

बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (09:53 IST)
नवरात्राचे उपवास असो किंवा इतर कोणतेही उपवास असो, नेहमी नेहमी तेच-तेच खाऊन कंटाळा येतो. साबुदाण्याची खिचडी, भगर, तेच पदार्थ खाऊन अक्षरश: वैताग आलेला असतो. त्यामुळे काही वेगळे खाण्याची इच्छा होऊ लागते. त्यासाठी नवीन काय बनवावं हा एक प्रश्नच असतो. काळजी नसावी, आम्ही आज आपल्याला सांगत आहोत उपवासाच्या पुऱ्या. ज्या चविष्ट तर असणारच पण करायला देखील अगदी सोप्या आहेत. 
 
साहित्य - 
2 वाटी राजगिऱ्याचे पीठ, 1/2 वाटी शिंगाड्याच पीठ, 1/2 वाटी शेंगदाण्याचं कूट, 4 ते 5 हिरव्या मिरच्यांची पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, सैंधव मीठ चवीपुरती, बारीक चिरलेली कोथिंबीर, शेंगदाण्याचं तेल किंवा तूप तळण्यासाठी.
 
कृती -
* राजगिरा पीठ आणि शिंगाड्याच पीठ चाळून हलके गुलाबी रंग येई पर्यंत भाजून घ्या.
* एका ताटलीत हे दोन्ही पीठ घालून वरील सर्व साहित्य मिसळून कणीक मळावी आणि काही काळ तसेच ठेवावं.
* आता या कणकेचे गोळे करून पुऱ्या लाटून तेलात किंवा तुपात सोडून खमंग असे तळून घ्यावं. गरम राजगिऱ्याच्या पुऱ्या तयार.
* तयार गरम पुऱ्या हिरव्या चटणी किंवा दह्याच्या रायता सह सर्व्ह कराव्यात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती