नवरात्राचा हा पावित्र्य सण सुरू झाला आहे. सगळीकडे एक पावित्र्य आणि धार्मिक वातावरण सुरू आहे. पण सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळे सण घरातच साजरे केले जात आहे. अशामुळे लोकं आपापल्या घरातच भजन, पाठ करत आहे. जर आपण आपल्या घरातच दुर्गासप्तशतीचे पठण करत असाल, तर काही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे नाही तर चांगल्याच्या ऐवजी आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. हे प्रत्येक चंडी किंवा दुर्गासप्तशती चा पाठ करणाऱ्यांसाठी समजून घेणं गरजेचं आहे.
2 चंडी पाठ करण्याच्या पूर्वी खोली शुद्ध, स्वच्छ, शांत आणि सुवासिक असावी. देवी आईच्या मूर्ती जवळ, देऊळात किंवा जवळ कोणत्याही प्रकाराची अशुद्धता नसावी.
असे म्हणतात की आपण ज्या इच्छापूर्ती साठी चंडीपाठाचे वाचन करत आहात, आपली ती इच्छा नवरात्राच्या काळात किंवा दसऱ्या पर्यंत पूर्ण होते. पण आपण जर का निष्काळजी पणा करत असाल आणि आपल्या कडून काहीही कळत-नकळत चुका होत असल्यास, आपल्या बरोबर अघटित घडतं किंवा अपघात होतात.