येग येग गौरा बाई,माहेरा च्या अंगणी,
नटून सजवून तुज पूजिल,साऱ्या जणी,
येताच माहेरा तू ग , होईल आंनद ,
सखी शेजारीण जमुन घालतील तुज साद,
हळदी कुंकवाचा होईल कार्यक्रम घरी,
सडा रांगोळ्या सजतील माझे दारी,
ओले हरभरे, करू कैरीची डाळ छान ,
कैरीचं पन्ह करू, सवाष्णी करतील प्राशन,
गौर सजवू खुशी खुशी,ठेऊ खेळणी त्यात,
वर्षोनुवर्षे हाच चालला से प्रघात,
जाता जाता तू गे देशील आशिष भरभरून,
तूच माझी आई, घेईन पदर पसरवून !
....अश्विनी थत्ते