काय सांगता, हिंदू वर्षात 36 नवरात्र असतात

गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (15:45 IST)
हिंदू धर्मात व्रत कैवल्याचं आणि उपवासाचे फार महत्व आहे. आता हे आपल्यावरच आहे की आपल्याला किती आणि कोणते प्रकारचे उपवास करावयाचे आहे. जसे की एकादशी, प्रदोष, चतुर्थी, श्रावणी सोमवार, किंवा नवरात्र इत्यादी. जर आपल्याला वाटत असल्यास की मी नवरात्राचे उपवास करावं तर आपल्याला हे सांगू इच्छितो आहोत की हे वर्षात 36 असतात. हे अतिशय महत्वाचे दिवस असतात.
 
36 रात्र - नवरात्र वर्षाच्या महत्वपूर्ण चार पावित्र्य महिन्यात येतात. हे चार महिने आहेत चैत्र, आषाढ, अश्विन, माघ. चैत्र महिन्यात चैत्र नवरात्राला वसंत नवरात्र देखील म्हणतात. आषाढ आणि माघाची नवरात्र गुप्त नवरात्र म्हणतात. अश्विन महिन्याच्या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात. जर का आपण वर्षाच्या या या 36 दिवस आणि रात्र साध्य केल्यास आपले भाग्य उत्कर्ष होईल. यासाठी आपल्याला या दिवसात कठोर उपास तपास करायला हवं. या दिवसात मद्यपान, मांस खाणं, आणि स्त्रियांशी लांब राहावं. उपवास करून नऊ दिवस पूजा केल्याने सर्व साधना आणि इच्छा पूर्ण होतात. आणि जर कोणी या नऊ दिवसात पावित्र्य जपत नाही त्यांचा वाईट काळ कधीही संपत नाही.
 
या रात्री पावित्र्य असतात - 
नवरात्र म्हणजे नऊ अहोरात्र म्हणजे विशेष रात्री. या रात्रींमधील निसर्गाचे अडथळे संपतात. दिवसापेक्षा रात्री दिलेली आवाज लांब पर्यंत जातो. म्हणून सिद्धी आणि ध्यान रात्रीच्या वेळेसच केले जाते. (या रात्रीत केले गेलेले शुभ संकल्प सिद्धीला पावतात).
 
वेगवेगळ्या देवी -
देवींमध्ये त्रिदेवी, नवदुर्गा, दशमहाविद्या आणि चौसष्ठ योगिनींचे गट आहे. आदिशक्ती अंबिका सर्वोच्च आहे आणि तिचेच हे सर्व रूप आहे. सती, पार्वती, उमा आणि काळी माता या भगवान शंकराच्या बायका आहेत. (अंबिका यांनीच दुर्गमसुराचा वध केला, म्हणून त्यांना दुर्गा माता म्हणतात).
 
9 देवी - 
शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघण्टा, कुष्मांडा, स्कन्दमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री यांची पूजा सिद्धी विधानाने केली जाते. आख्यायिका अशी आहे की कात्यायनी नेच महिषासुराचा वध केला होता. म्हणून त्यांना महिषासुरमर्दिनी असे ही म्हणतात. (दुर्गा सप्तशतीनुसार यांचे इतर रूप देखील आहे. - ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, नरसिंही, इंद्री, शिवदूती, भीमादेवी, भ्रामरी, शाकंभरी, आदिशक्ती आणि रक्तदन्तिका).

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती