राजगिऱ्याच्या पिठाची शंकरपाळी

साहित्य : 3 वाटी राजगिरा पीठ, 3/4 वाटी गूळ बारीक चिरून, 2 लहान चमचे कडकडीत मोहन तुपाचे, तळण्यासाठी तेल.

कृती : थोड्या पाण्यात गूळ भिजवून ठेवा. राजगिऱ्याचे पीठ चाळून घ्या. कडकडीत तुपाचे मोहन घाला. चांगले मिसळून घ्या. वरील भिजवलेल्या गुळाचे पाणी घाला, हालवून चांगले मिसळून पीठ मळून घ्या. घट्ट वाटल्यास थोडे पाणी लावा. घट्ट गोळा करून पोळपाटावर राजगिऱ्याचे पीठ पसरवून पोळी लाटून घ्या, चाकूने चौकोनी काप पाडा. कढईत गरम तेलावर शंकरपाळी तळून घ्या.

वेबदुनिया वर वाचा