यंदा नऊ नाही दहा दिवसांची आहे नवरात्री, 18 वर्षांनंतर महासंयोग

सोमवार, 26 सप्टेंबर 2016 (17:08 IST)
या वेळेस नवरात्री 9च्या जागेवर 10 दिवस राहणार आहे. हा संयोग 18 वर्षांनंतर येत आहे. नवरात्री 10 दिवस असण्याचे मुख्य कारण प्रथमा दोन दिवस आली आहे. 10व्या दिवशी देवीच्या प्रतिमेचे विसर्जन करण्यात येईल.  
 
नेहमीप्रमाणे ही नवरात्री देखील बरीच उमेद आणि आशा घेऊन आली आहे पण या नवरात्रीचे एक मुख्य कारण असे आहे की ती जातकांसाठी फारच शुभ ठरणार आहे. यामागील मुख्य कारण असे आहे की नवरात्र पूर्ण दहा दिवसांची आहे, असा संयोग पूर्ण 18 वर्षांनंतर येत आहे. या दिवसांमध्ये भाविक पूजा-अर्चना, साधना करून पुण्यलाभ घेऊ शकतात.  
 
नवरात्र 1 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे, 11व्या दिवस विजयादशमी अर्थात सिद्दिदात्रीचा असेल. नवरात्रीच्या दिवसांमध्ये भक्तगण उपास ठेवतात, दुर्गासप्तशतीचा पाठ करतात आणि देवीला वेगवेगळे प्रसाद दाखवतात.  
 

वेबदुनिया वर वाचा