गरबा खेळा पण आहाराकडे लक्ष्य द्या!

नवरात्रीच्या दरम्यान गरबा खेळताना लोकांच्या शारीरिक व्यायामात वाढ होते. म्हणून 9 दिवस गरबा खेळण्यासाठी काही दिवस आधीच स्टेमिना विकसित करण्याची गरज असते. त्यासाठी गरबे खेळण्याआधी गरब्याची प्रॅक्टिस करणे जरूरी असते.

नवरात्रीच्या वेळेस खासकरून लक्षात ठेवणे म्हणजे किमान 6-7तास झोप घेणे जरूरी आहे. जर रात्री उशीरा झोपत असाल तर दिवसा काही तास झोप घेणे जरूरी असते.

गरबा खेळताना घाम जास्त वाहतो म्हणून रोज 12-15 ग्लास पाणी पिणे जरूरी आहे.

जर तुम्ही रोज गरबा खेळत असाल तर आपल्या सामान्य आहारात 300-400 ग्रॅम कॅलोरी जास्त प्रमाणात घ्यावी.

सकाळी कोंबट कोमट पाण्यात 1-2 थेंब लिंबाचा रस व 1/4 चमचा मध घालून प्यायला पाहिजे. त्याच्या अर्धा तासानंतर एक ग्लास दुधाचे सेवन केले पाहिजे.

सकाळी 10-11 च्या दरम्यान असे फळं खावे ज्यात कॅलोरी जास्त प्रमाणात असते.

दुपारी जेवणात 2 पोळ्या, भात, वरण, दही, भाज्या, मिठाई व पनीराचे कुठलेही एखादे व्यंजन चालतील.

दुपारच्या वेळेस मिल्क शेक, ज्यूस किंवा नारळ पाणी अवश्य घ्यावे.

गरबा खेळायला जाण्याअगोदर 2-3 तास आधी उकडलेले बटाटे, साबुदाण्याची खिचडी, रोस्टेड ग्राउंडनट सारखे व्यंजन किंवा फळांचे सेवन करून गेले पाहिजे.

गरबा खेळताना प्रत्येक अर्धा तासानंतर ग्लूकोज घ्यायला पाहिजे, ज्याने अशक्तपणा येत नाही.

गरबा खेळल्यानंतर कोमट पाण्याने पाय जरूर धुवावे. असे केल्याने शरीर आणि पायाला आराम मिळेल.

रात्री झोपण्याअगोदर एक ग्लास दुधाचे सेवन अवश्य करायला पाहिजे.

गरब्याच्या काळात तेलकट पदार्थ, जंक फूड व बाहेरील पदार्थ शक्यतोवर खाणे टाळावे.

वेबदुनिया वर वाचा