चिमनी पडून आठ ठार, 100 पेक्षा जास्‍त दबले

सोमवार, 24 मे 2010 (17:35 IST)
उत्तर प्रदेशातील झाशी शहरापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्‍या परीछा येथे बांधकाम सुरू असलेली विद्युतगृहाची चिमनी पडून मोठा अपघात झाला असून यात आठ मजूरांचा मृत्यू तर 100 पेक्षा जास्‍त जण दाबले गेल्‍याची शक्यता आहे घटनास्‍थळी बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत आठ मृतदेह बाहेर काढण्‍यात यश आले आहे.

उत्तर प्रदेश राज्य विद्युत उत्पादन निगमचे अध्यक्ष सहप्रबन्ध संचालक आलोक टंडन यांनी याबाबत दिलेल्‍या माहितीनुसार परीछामध्‍ये विजनिर्मिती गृहाच्‍या 250-250 मेगावॅटमध्‍ये काम सुरू असून यापैकी एक निर्माणाधीन चिमनी कोसळून मोठा अपघात घडला आहे.

या ठिकाणी नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कंपनी (एनबीसीसी) कडून बांधकाम सुरू असून झाशीमधून मिळालेल्‍या माहितीनुसार चिमनी लंचच्‍या वेळी पडली. दुपारच्‍या जेवणाची वेळ असल्‍याने या चिमनीच्‍या सावलीत बसून अनेक मजूर जेवण करीत होते. ते याखाली दाबले गेले आहेत.

वेबदुनिया वर वाचा